लखनऊ-आगरा एक्सप्रेस वेवर दाट धुक्यामुळे विचित्र अपघात

 मंगळवारी सकाळी एक्सप्रेसवेवर यूपीच्या उन्नाव जवळ जोगी कोट येथे १० गाड्या एकमेकांना आदळल्या.

Updated: Dec 19, 2017, 12:33 PM IST
लखनऊ-आगरा एक्सप्रेस वेवर दाट धुक्यामुळे विचित्र अपघात  title=

उन्नाव : थंडी आणि धुक्यामूळे लखनौ-आगरा एक्सप्रेसवे जिवघेणा ठरत आहे. मंगळवारी सकाळी एक्सप्रेसवेवर यूपीच्या उन्नाव जवळ जोगी कोट येथे १० गाड्या एकमेकांना आदळल्या.

या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. 

१० गाड्या आदळल्या 

 वेगाने चालणाऱ्या गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात १० गाड्या एकमेकांवर धडकल्या. दुर्घटनेचे भयावह फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अपघाताच्या दोन घटना  

 यमुना एक्सप्रेसवरही धुक्यामूळे एकानंतर एक कित्येक गाड्या एकमेकांना ठोकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. 

दुसरीकडे यूपीच्या बस्ती जिल्ह्यात धूक्यामूळे ट्रॅक्टर आणि बोलेरोमध्ये ठोकर झाली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता.