10 वी पास असलेल्यांसाठी भारतीय सेनादलात नोकरी

10 वी आणि 12 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 6, 2018, 10:26 AM IST
10 वी पास असलेल्यांसाठी भारतीय सेनादलात नोकरी  title=

मुंबई : 10 वी आणि 12 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. 

भारतीय सेना दलात नोकरी करण्याची या उमेदवारांना मिळणार आहे. सगळ्या वर्गातील उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतात. ही सर्व प्रक्रिया निःशुल्क असणार आहे. उमेदावारांची नेमणूक ही लेखी परिक्षा आणि फिजिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे 

काय आहेत नियम 

एकूण जागा : 15 
या पदासाठी : लोअर डिव्हिजन क्लर्क व फायरमॅन 
शैक्षणिक योग्यता : 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, टायपिंग 
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष 
वेबसाइट : www.indianarmy.nic.in 
शेवटची तारीख : 15 मार्च 2018 

अशापद्धतीने भरा फॉर्म 

संकेतस्थळावर क्लिक करून भरतीसाठीचा फॉर्म उपलब्ध होईल. तो डाऊनलोड करून पहिल्यांदा पूर्णपणे वाचा. त्यानंतर योग्य ती माहिती त्यामध्ये भरा. त्यानंतर तो फॉर्म योग्य पद्धतीने वाचल्यानंतर खालील पत्यावर पाठवा. 

या पत्त्यावर पाठवा 

मिनिस्ट्री ऑफ डिफेंस, 16 फील्ड एम्युनिशन डिपो, सी/ओ 99 एपीओ 

शुल्क : या भरतीकरता निशुःल्क सेवा दिली जाणार आहे.