एसबीआयमध्ये भरती, ९ हजाराहून अधिक जागा रिक्त

 स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदाच्या ९,६३३ जागांची भरती आहे. 

Updated: Jan 20, 2018, 03:52 PM IST
एसबीआयमध्ये भरती, ९ हजाराहून अधिक जागा रिक्त  title=

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदाच्या ९,६३३ जागांची भरती आहे.

यासाठी १८ फेब्रुवारी २०१८ ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.

पात्रता 

२० ते २८ वर्षातील व्यक्ती यासाठी अर्ज करु शकतात. ओबीसी आणि एससी-एसटी उमेदवारांना यामध्ये सूट मिळणार आहे. 

२० जानेवारी पासून ही भरती सुरू होणार आहे. १८ फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. 

एसबीआय क्लर्कसाठी प्रिलिमनरी परीक्षा मार्च/एप्रिल २०१८ मध्ये होण्याचे संकेत आहेत.