वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत.

Updated: Jul 17, 2017, 07:49 PM IST
वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

नवी दिल्ली : वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी वेंकय्या नायडू यांच्या नावाची घोषणा केली आहे. वेंकय्या नायडू हे सध्या केंद्रीय नागरीविकास मंत्री आहेत.

भाजप मुख्यालयात एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

५ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे. तर अर्ज मागे घ्यायची तारीख २१ जुलै आहे. यूपीएनं उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.