उपराज्यपाल किरण बेदी आणि आमदारामध्ये बाचाबाची

आमदाराला मंचावरुन निघून जाण्यास सांगितलं

Updated: Oct 2, 2018, 05:05 PM IST
उपराज्यपाल किरण बेदी आणि आमदारामध्ये बाचाबाची title=

नवी दिल्ली : पद्दुचेरीच्या उपराज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. उपराज्यपाल बनल्यानंतर किरण बेदी आणि वी नारायणस्वामी यांच्यात अनेक वाद समोर आले आहेत. पुद्दुचेरीमध्ये मंगळवारी काही असंच पाहायला मिळालं. पण यावेळी किरण बेदी आणि एआयएडीएमकेचे आमदार यांच्यात ही बाचाबाची झाली. 

कार्यक्रमात बाचाबाची 

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका सरकारी कार्यक्रमात किरण बेदी आणि एआयएडीएमकेचे आमदार यांच्यात ही बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

मंचावरुन निघून जाण्यास सांगितलं

या व्हि़डिओमध्य़े किरण बेदी आमदाराला मंचावरुन निघून जाण्यास सांगत आहेत. याआधी आमदाराने किरण बेदी यांना बरंच काही म्हटलं. या व्हि़डिओमध्ये किरण बेदी एआयएडीएमकेचे आमदार ए अनबलगन यांना म्हणत आहे की, 'कृपया येथून निघून जा. यानंतर काही लोकांना टाळ्या देखील वाजवल्या. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

किरण बेदींवर भडकले

आमदार ए अनबलगन कार्यक्रमादरम्यान भाषण करत असताना पुद्दुचेरी प्रशासनावर टीका करत होते. पण या दरम्यान किरण बेदी यांनी त्यांचा माईक बंद करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर ते किरण बेदी यांच्यावर भडकले आणि तेथून निघून गेले.