VIDEO : राजीनाम्यानंतर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर...

माजी खासदार नाना पटोले आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन राजीनामा मान्य करण्याची विनंती केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी पटोले यांचा राजीनामा मान्य केलाय.

Updated: Dec 13, 2017, 05:42 PM IST
VIDEO : राजीनाम्यानंतर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर...  title=

नवी दिल्ली : माजी खासदार नाना पटोले आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन राजीनामा मान्य करण्याची विनंती केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी पटोले यांचा राजीनामा मान्य केलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मुख्यमंत्र्यांनी लायकी काढण्यापेक्षा बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी कोणते काम केले, ते सांगावे. मी मागासवर्गीय असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लायकी काढू शकतात, त्यांना तसा अधिकार असल्याचा' टोमणा नाना पटोले यांनी लगावलाय.