भारतात न येण्यासाठी माल्याला सापडले हे कारण

भारत सरकार विजय माल्याला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. पण भारतीय बॅंकाकडून ९०० कोटी घेऊन फरार झालेला माल्याही काही कमी नाहीए. ही अटक वाचविण्यासाठी माल्याने नवे कारण शोधले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 15, 2017, 07:59 AM IST
भारतात न येण्यासाठी माल्याला सापडले हे कारण  title=

नवी दिल्ली : भारत सरकार विजय माल्याला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. पण भारतीय बॅंकाकडून ९०० कोटी घेऊन फरार झालेला माल्याही काही कमी नाहीए. ही अटक वाचविण्यासाठी माल्याने नवे कारण शोधले आहे. 

लंडनमध्ये सुरू असलेल्या प्रत्यर्पण प्रकरणात माल्याने स्वत:ची बाजू मांडताना नवा लंगडा युक्तीवाद केला आहे.

पूर्व ब्रिटीश सैनिकांचा ग्रुप चेन्नई सिक्सच्या एका सैनिकाला भारतीय तुरूंगात जबरदस्ती मानसिक रोग्यांचे औषध खाण्यास भाग पाडले होते असे माल्याचे म्हणणे आहे.

वॉन्टेड माल्या

६१ वर्षांचा माल्या भारतात मनी लॉंड्रींगप्रकरणात वॉन्टेड आहे. किंगफिशर एअरलाईन्सप्रकरणात त्याने भारतीय बॅंकाकडून १.४ अरब डॉलर घेतले आहेत.

भारतीय जेलची अवस्था बिकट 

फोर्स इंडिया फॉर्मूला वन टीमचा को-ओनर विजय माल्या मार्च २०१६ पासून ब्रिटनमध्ये आहे. हे प्रकरण राजकारणाने प्रभावित असल्याचे माल्याने सांगितले आहे.

वेगवेगळ्या मुद्यांवर तो केस लढत आहे. भारतीय जेलची अवस्था ही ब्रिटीश ह्यूमन लॉच्या तुलनेत वाईट असल्याचेही त्याचे म्हणणे आहे.

माल्याच्या वकीलाने जेल अवस्था विशेषज्ञ एलन मिशेल यांच्याकडे चौकशी केली. चार वर्षांपूर्वी हत्यार स्मगलिंग प्रकरणात भारतीय जेलमध्ये बंद असलेल्या सैनिकाशी दोन दिवसांपूर्वी एलन ने चौकशी केली होती.

अनेक यशस्वी अपील केल्यानंतर त्या सैनिकांना चेन्नई सोडले गेले आणि गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये आणले.

काय आहे सैनिक प्रकरण ?

लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टात विशेषज्ञ एलन मिशेलने सांगितले, एक जेलमध्ये जास्त चालत होता म्हणून त्याला १५ गार्डनी पकडून मानसोपचार तज्ञाकडे नेले. 

मानसोपचार तज्ञाने हॉस्पीटलमध्ये त्याला बांधले, मारले आणि जबरदस्ती इंजेक्शन दिले. सैनिकाला जबरदस्ती मानसिक रोगाची औषधे देण्यात आली.

पण सैनिक त्या गोळ्या खाण्यापासून वाचला. माल्याच्या वकिलाने अशी बाजू मांडल्यावर माल्या प्रत्यार्पणाची शक्यता कमी होईल असे त्यांना वाटते.