मोदी आणि हिंदू मुक्त भारत करण्याची मुसाची धमकी

एकीकडे भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली असताना आता एका दहशतवाद्याने `मोदी आणि हिंदू मुक्त भारत' करण्याची धमकी दिली आहे.

Updated: Sep 1, 2017, 11:26 AM IST
मोदी आणि हिंदू मुक्त भारत करण्याची मुसाची धमकी title=

नवी दिल्ली : एकीकडे भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताची घोषणा दिली असताना आता एका दहशतवाद्याने `मोदी आणि हिंदू मुक्त भारत' करण्याची धमकी दिली आहे.

गायीची पूजा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंपासून भारताला मुक्त करणार असल्याची धमकी अल कायदाचा दहशतवादी जाकीर मुसाने दिली. 

दहा मिनिटाचा व्हिडिओतून करून त्याने ही धमकी दिली आहे. या व्हिडिओतून त्याने भारतावर जोरदार टीका केली आहे. जाकीर मुसा हा अल कायदाच्या गजवा-ए-हिंद या सेलचा प्रमुख आहे. यापूर्वी तो हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत कार्यरत होता. 'अंसर गजवा' या युट्यूब चॅनलवरून त्याने ही धमकी दिली आहे. 

गोपूजक नरेंद्र मोदी राजकारण आणि कुटनितीद्वारा अनेक लोकांना गोळा करू शकतात. पण ते आम्हाला रोखू शकत नाही. आम्ही भारतावर इस्लामी झेंडा फडकवणार. तोपर्यंत आमचा प्राण त्यागणार नाही, असे वक्तव्यही त्याने केले. 

जम्मूतील रोहिंगे मुस्लिमांच्या प्रश्नावरूनही मुसाने भारताला धमकावले आहे. देशातील ४० हजार रोहिंगे मुसलमानांना निर्वासित करण्याची योजना आखत असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं. त्यात जम्मूत राहणारे ६ हजार मुस्लिम आहेत.