लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही - सुप्रीम कोर्ट

लग्नानंतरही महिलेला तिच्या मूळ धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे..... लग्नानंतर महिलेचा धर्म बदलतो, असा कुठलाही कायदा सांगत नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 8, 2017, 11:06 AM IST
लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही - सुप्रीम कोर्ट title=

नवी दिल्ली : लग्नानंतरही महिलेला तिच्या मूळ धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे..... लग्नानंतर महिलेचा धर्म बदलतो, असा कुठलाही कायदा सांगत नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. 

पाहा काय म्हणालंय कोर्ट?

लग्न झाल्यानंतर महिलेचा धर्म हा तिच्या पतीच्या धर्मात विलीन होतो, आणि तिला पतीच्या धर्माचं पालन करावं लागतं, असं कुठल्याही कायद्यात म्हंटलेलं नाही. असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय. 

एका पारशी महिलेच्या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं हा निर्वाळा दिलाय. पारसी महिलेचं लग्न दुस-या धर्मातल्या पुरुषाशी झालं, तर ती महिला पारसी धर्माचं पालन करण्याचे अधिकार गमावते, असं गुजरात हायकोर्टानं 2010 मध्ये म्हंटलं होतं. त्यासाठी कोर्टानं पारंपारिक कायद्याचा दाखला दिला होता. 

पारसी महिलेने केली होती याचिका

गोलरुख गुप्ता या पारसी महिलेनं या तथाकथित पारंपारिक कायद्याला आव्हान देत सुप्रीम कोर्टात ही याचिका केली होती. लग्न झाल्यावर महिलेचा धर्म बदलतो, असं कुठलाही कायदा सांगत नाही, उलट  भिन्नधर्मीय लोकांचं एकमेकांशी लग्न झाल्यावर आपापल्या धर्माचं ते पालन करु शकतात, असं स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत स्पष्ट करण्यात आलंय. याचा दाखलाही सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी दिला. लग्न झाल्यानंतर पुरुषाचा धर्म बदलत नाही, महिलांच्याच बाबतीत हा फरक कशाला, असंही सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं.