निवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 18, 2017, 12:08 PM IST
निवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधकांना चिमटे

गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले आहे. उत्तर प्रदेशमध्ये २ मुलं हारली होती. तर गुजरातमध्ये ४ मुलं हारली आहे. अशी प्रतिक्रिया योगींनी दिली आहे.

राहुल गांधीवर टीका

राहुल गांधी जेथे जेथे जातात तेथे काँग्रेस हारते अशी टीका योगींनी राहुल गांधीवर केली आहे. योगींनी पुढे म्हटलं की, विरोधकांनी विचार करावा. २०१९ मध्ये आमचा विजय निश्चित आहे.

भाजप गुजरात आणि हिमाचलमध्ये सरकार बनवेल असे चिन्ह आहेत. भाजपने बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्यावर आघाडी मिळवली आहे.