पुढील महिन्यात आपोआप वाढणार PF अकाऊंटमधील रक्कम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या पीएफच्या रकमेत आपोआप वाढ होणार आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 22, 2017, 11:06 PM IST
पुढील महिन्यात आपोआप वाढणार PF अकाऊंटमधील रक्कम  title=

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) लवकरच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुमच्या पीएफच्या रकमेत आपोआप वाढ होणार आहे.

ईपीएफओ पूढील महिन्यात पीएफ अकाऊंटमधील रकमेत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. ईपीएफओच्या ५ कोटीहून अधिक ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

महिन्याभरात होणार निर्णय

ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची नोव्हेंबर महिन्यात बैठक होणार आहे. या निर्णयाबाबत बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. एक्सचेंज ट्रेडड फंड (ईटीएफ) मध्ये गुंतवलेल्या रकमेचा काही हिस्सा पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ईटीएफ एक प्रकारचं स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक आहे, हे बॉण्डच्या माध्यमातून करण्यात येतं.

कॅगने ईपीएफओच्या या निर्णयाला मंजूरी दिली आहे. श्रम मंत्रालयातील सुत्रांच्या मते, या वर्षाच्या सुरुवातीला सीबीटीच्या बैठकीत हा प्रस्ताव कॅगकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, कॅगने या प्रस्तावावर सहमती दर्शवत काही आक्षेप घेतले आहेत. यावर आगामी बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत ईपीएफओद्वारे ईटीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आकडा ४५ हजार कोटींवर पोहोचणार आहे. ईपीएफओने ईटीएफमध्ये ऑगस्ट २०१५ पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. पूर्वी ५ टक्के गुंतवणूक होती मात्र, आता ही गुंतवणूक वाढून १५ टक्के करण्यात आली आहे.