हत्तींसोबत सेल्फीचा प्रयत्न, युवकाला हत्तीने चिरडलं

हत्तींसोबत सेल्फी घेणाच्या प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला हत्तींनी चिरडून ठार केल्याची दुदैवी घटना कर्नाटकमधील बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यान घडली.

Cars | Updated: Jul 27, 2017, 11:53 PM IST
हत्तींसोबत सेल्फीचा प्रयत्न, युवकाला हत्तीने चिरडलं title=

बंगळुरू : हत्तींसोबत सेल्फी घेणाच्या प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला हत्तींनी चिरडून ठार केल्याची दुदैवी घटना कर्नाटकमधील बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यान घडली.

सेल्फीच्या मोहापायी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याच्या घटना समोर येतात. तरीदेखील सेल्फीचा मोह कमी होताना दिसत नाही. 

उद्यानाजवळ असलेल्या हक्की-पिक्की कॉलनीच्या मागील बाजूस अभिलाषने गाडी पार्क केली होती. यावेळी त्याच्यासोबत मित्रदेखील होते. अभिलाषने या उद्यानातील हत्तीसोबत सेल्फी काढण्यास सुरूवात केली होती. 

सेल्फीमध्ये गुंग झालेल्या अभिलाषला हत्तीची आक्रमकता समजली नाही आणि त्यातच हत्तीच्या हल्ल्यात अभिलाषचा मृत्यू झाला असल्याची माहिती बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गिरीनगर येथे राहणारा तीस वर्षीय अभिलाष मंगळवारी बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यानात गेला होता. त्यावेळी त्याने हत्तींसाठी असलेल्या क्षेत्रात प्रवेश केला होता. 

उद्यान दर मंगळवारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत असतानादेखील अभिलाषने प्रवेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे., या घटनेमुळे बनेरघट्ट राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उभे राहिले आहेत.