पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी; वसईतील नागरिक बेहाल

ार दिवसानंतरही अनेक घरांमध्ये साचलेले पाणी कमी झालेले नाही. 

Updated: Jul 14, 2018, 04:35 PM IST
पाण्याच्या टाक्यांमध्ये शिरले गटाराचे पाणी; वसईतील नागरिक बेहाल title=

वसई: काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई शहराला पाण्याचा वेढा पडला होता. यामुळे शहरातील बहुतांश घरे पाण्याखाली गेली होती. अनेक इमारतींमधील तळमजल्यावरील घरांमध्ये चार ते पाच फूट पाणी साचले होते. आता पाऊस थांबून चार दिवस झाल्यामुळे परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षा सर्वांनी होती. 

मात्र, चार दिवसानंतरही अनेक घरांमध्ये साचलेले पाणी कमी झालेले नाही. या पाण्यासोबत वाहून आलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्येच गटाराचे पाणी शिरले आहे. वसईतील जवळपास १२ सोसायट्यांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिक पाणी आणि वीज या सुविधांअभावी पूर्णपणे बेहाल झाले आहेत. 

 

मुंबईच्या समुद्रात उंचच उंच लाटा; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

ऐन सुट्टीच्या दिवशी समुद्रात उंचच उंच लाटा उसळ्यामुळे पावसाळा एन्जॉय करणारा मुंबईकर भलताच खूश आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी एकच्या सुमारास सुमारे ४.९६ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांचा आनंद घेण्यासाठी आणि विकेंड साजरा करण्यासाठी हौशी मुंबईकरांनी मरीन लाइन्स, वरळी सी-फेस आणि गेट वे ऑफ इंडिया इथं गर्दी केली. मुंबईत पुढील ४ दिवस धोक्याचे असणार आहेत. या कालावधीत समुद्राला मोठी भरती असून समुद्रात शनिवारी ४.९६ ,रविवारी ४.९७ सोमवार ४.८९ व मंगळवारी ४.७० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. दरम्यान रविवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.