फेरीवाल्यांना मारहाण प्रकरणी पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई

 फेरीवाल्यांविरोधात मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलनाला सुरूवात केली. पण आता याचे पडसाद दिसायला सुरूवात झाली आहे. ठाण्यात फेरीवाल्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी  कडक कारवाईला सुरूवात केली  आहे. 

Updated: Nov 7, 2017, 10:40 AM IST
फेरीवाल्यांना मारहाण प्रकरणी पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई  title=

मुंबई :  फेरीवाल्यांविरोधात मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलनाला सुरूवात केली. पण आता याचे पडसाद दिसायला सुरूवात झाली आहे. ठाण्यात फेरीवाल्यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी  कडक कारवाईला सुरूवात केली  आहे. 

ठाण्यातल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी दणका दिलाय. आठ कार्यकर्त्यांना चॅप्टर केस संदर्भात नोटीसा पाठवल्यात. जामीनासाठी 1 कोटीची हमी का मागू नये, अशी विचारणा केली आहे.

मुंबईमध्ये मनसेनं फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यावर त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले होते. मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावुन लावत त्यांच्या सामानाची तोडफोड केली होती.