Kokan News

अलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा

अलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा

रायगडमधील गोरगरीब रूग्णांना आता सिटीस्कॅनच्या सुविधेसाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नाही. अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध झाली आहे. 

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

रत्नागिरीला पावसाने झोडपून काढलंय. चिपळूणमध्ये पावसाने कहर केलाय. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केलीय. 

मच्छिमार आंदोलन नितेश राणेंची स्टंटबाजी : तांडेल

मच्छिमार आंदोलन नितेश राणेंची स्टंटबाजी : तांडेल

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांसाठी केलेले आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलीय. 

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती

सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. 

 'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला

'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला

कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.  

शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची दूरवस्था

शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची दूरवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याची दूरवस्था झाली आहे. 

गणेशोत्सवासाठी एसटीची जय्यत तयारी, कोकणात जाणार २२०० पेक्षा जास्त बस

गणेशोत्सवासाठी एसटीची जय्यत तयारी, कोकणात जाणार २२०० पेक्षा जास्त बस

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी एसटीनं जय्यत तयारी केलीय. यावेळी २२ जुलैपासून ऑनलाईन आरक्षण सुरू केलं जाणार आहे.

तुम्हीही होऊ शकता एक दिवसाचे कैदी, असा घेऊ शकता अनुभव

तुम्हीही होऊ शकता एक दिवसाचे कैदी, असा घेऊ शकता अनुभव

कारागृहाविषयी सर्वसामान्यात एक भिती असते. तसेच एक सुप्त आकर्षणही असते. नेमकी हीच उत्सुकता लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृहात 'फील द जेल' हा आगळावेगळा उपक्रम राबवला जातोय. तुम्हाला एक दिवस कैदी होऊन तुरुंगवास अनुभवता येईल. 

महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा

महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.

नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?

नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?

सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे  नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.  एकूण  २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे.  हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे. 

मुसळधार पावसाने भिवंडीत  ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले

मुसळधार पावसाने भिवंडीत ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले

भिवंडी महापालिका क्षेत्रासोबतच तालुक्यात रात्रीपासून पड़त असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलेय. नदीनाका परिसरात सुमारे ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे महापालिकेचे नालेसफाई झाल्याचे दावे वाहून गेले. 

कोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी

कोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी

कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.

रायगडमध्ये मुसळधार, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

रायगडमध्ये मुसळधार, प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पोलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

भिवंडी वडपे बायपास रस्त्यावर कारचा अपघात

भिवंडी वडपे बायपास रस्त्यावर कारचा अपघात

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी वडपे बायपास रस्त्यावर इनोव्हा कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात नाशिकमधल्या चौघांचा मृत्यू झालाय. 

अंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड

अंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड

सध्या सगलीकडेच सरकारी कामांसाठी तसेच इतर अनेक कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य झालेय. आधारकार्डला इतके महत्त्व असतानाही अंबरनाथमध्ये आधारकार्ड कचऱ्यामध्ये फेकल्याची घटना समोर आलीये.

अडरे धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह

अडरे धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह

चिपळूण तालुक्यातील अडरेमधील धरणात गणेश चाळके या ३०  वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला. 

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 

फिरत्या प्रदर्शनाची 'सायन्स एक्सप्रेस' रत्नागिरीत!

फिरत्या प्रदर्शनाची 'सायन्स एक्सप्रेस' रत्नागिरीत!

रत्नागिरीच्या स्थानकात सायन्स एक्प्रेस दाखल झालीय. या एक्स्प्रेसला पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत. 

 रायगड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

रायगड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

7 ते 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या 24 तासांमध्ये रायगड जिल्हयात दमदार हजेरी लावली. 

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

इमारतीच्या गच्चीवरुन पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

इमारतीच्या गच्चीवरुन पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

इमारतीच्या गच्चीवर  खेळत असताना तोल जाऊन खाली पडून एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.