Kokan News

भाजपमध्ये जाण्याबद्दल मिश्किल हसले राणे....

भाजपमध्ये जाण्याबद्दल मिश्किल हसले राणे....

 राणे भाजपमध्ये जाणार... भाजपमध्ये जाणार अशा शक्यता अनेक दिवसांपासून व्यक्त होत आहे.  याबाबत नारायण राणे यांना विचारले असता आपल्या खास शैलीत नारायण राणे यांनी हा प्रश्न टोलवून लावला. 

रश्मी वहिनींबद्दल राणे बोलले असं काही...

रश्मी वहिनींबद्दल राणे बोलले असं काही...

 तब्बल १२ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी आपल्यातील कटूता कमी केली आहे. 

उद्धव ठाकरेंनीकेलेल्या उल्लेखाबद्दल नारायण राणे बोलले असे काही...

उद्धव ठाकरेंनीकेलेल्या उल्लेखाबद्दल नारायण राणे बोलले असे काही...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा उल्लेख माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे असा केला त्यावेळी माझ्या मनात काय भावना आल्या ते शब्दांत सांगणं कठीण आहे त्यामुळे सांगण्याचा प्रयत्नही करणार नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी पत्रकारांनी बोलताना भावना व्यक्त केल्या. 

उद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!

उद्धव ठाकरे राणेंबद्दल असे म्हणालेत व्यासपीठावर!

येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. यावेळी राणे यांनी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर उद्धव यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत राणेंचा भाषणात उल्लेख केला. 

राणेंनी भाषणात उद्धव, रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले!

राणेंनी भाषणात उद्धव, रश्मी ठाकरे यांचे नाव घेतले!

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. नारायण राणेंनी भाषणाला सुरूवात करताच राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली. तर भाषणात उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करताच शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.  

गडकरींनी रश्मी ठाकरे यांना दिले मानाचे स्थान

गडकरींनी रश्मी ठाकरे यांना दिले मानाचे स्थान

कोकण विकासाला चालना देणाऱ्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन त्यांना व्यासपीठावर येणाची विनंती केली.

 मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प

मुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प

मुंबई गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वडाचे झाड हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे-राणे कार्यक्रमात एकाच व्यासपिठावर?

ठाकरे-राणे कार्यक्रमात एकाच व्यासपिठावर?

भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नारायण राणे अशी दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. 

पुन्हा राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत

पुन्हा राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत

कणकवलीत कार्यक्रमाच्या  निमित्तानं लावण्यात आलेल्या होर्डिंगवर काँग्रेसचा उल्लेखही नाही. 

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

नारायण राणेंच्या होर्डिंग्जवरून 'काँग्रेस' गायब!

आज सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आलाय.

मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा, श्रेयवादावरून संघर्ष

मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा, श्रेयवादावरून संघर्ष

मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज होतोय. मात्र त्याआधीच शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादावरून संघर्ष सुरु झालाय.  तर दुसऱ्या बाजूला या सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 

 मोबाईल मार्केटमध्ये छापे,  लाखो रुपयांचा माल जप्त

मोबाईल मार्केटमध्ये छापे, लाखो रुपयांचा माल जप्त

तुम्ही जर विविध आकर्षक कंपन्याच्या मोबाईलचे शौकिन असाल तर हि बातमी जरूर पहा... सध्या बाजारात मोबाईलचे बनावट साहित्य विकलं जातंय..

कुळ, अपुरं, खोडशी... ठाण्यात भरलंय रानभाज्यांचं फेस्टिव्हल

कुळ, अपुरं, खोडशी... ठाण्यात भरलंय रानभाज्यांचं फेस्टिव्हल

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला लागतात... शहरात तर या भाज्या मिळणं तसं कठिणच असतं... शहरात राहणाऱ्या लोकांना या वेगवेगळ्या भाज्यांची माहिती व्हावी, यासाठी ठाण्यात रानभाज्यांच्या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. 

सिंधुदूर्गात जि.प. सदस्याच्या घरी चोरांचा डल्ला

सिंधुदूर्गात जि.प. सदस्याच्या घरी चोरांचा डल्ला

भरदिवसा होणा-या या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालाय. 

पार्किंग जागेवर फ्लॅटचे बांधकाम, विकासकाविरोधात गुन्हा दाखल

पार्किंग जागेवर फ्लॅटचे बांधकाम, विकासकाविरोधात गुन्हा दाखल

पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृतपणे फ्लॅट बांधून त्याची विक्री करणा-या बांधकाम व्यावसायिकाविरोधात अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

ठाण्यानंतर आता डोंबिवलीतही एका अल्पवयीन मुलीचा रिक्षावाल्याने विनयभंग करण्याची घटना घडलीय. 

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

'फी'साठी डीएसडी शाळेनं पालकांविरुद्ध नेमले गुंड!

कल्याण येथील डीएसडी शाळेच्या विरोधात पालकांनी गेटसमोर घोषणाबाजी देऊन आंदोलन केले. पालकांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

चिपळुणातील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अनुत्तरीच

चिपळुणातील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अनुत्तरीच

शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील १५ कुटुंबियांचा पुर्नवसानाचा प्रश्न अद्यापही जैसेथेच आहे गेल्यावर्षी घरांवर दरड कोसळेल या भीतीमुळे येथील 15 कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात आलं. वर्षभरात पुर्नवसन करू असं आश्वसान प्रशासनाने दिलं होतं. मात्र अद्याप पुर्नवसनाचा प्रश्न तसाच आहे. 

ठाण्यात पालिका नालेसफाईचा बोजवारा

ठाण्यात पालिका नालेसफाईचा बोजवारा

महापालिकेने केलेली नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

ना डॉक्टर, ना कर्मचारी... हॉस्पीटलच्या आवारात महिलेची प्रसुती

ना डॉक्टर, ना कर्मचारी... हॉस्पीटलच्या आवारात महिलेची प्रसुती

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उपचाराविना एक आदिवासी गरोदर महिला प्रसुत होण्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यात घडली.