Daily live Update : झी २४ तास लाइव्ह अपडेट

Daily live Update : झी २४ तास लाइव्ह अपडेट

LIVE UPDATE

21 Mar 2018, 13:03 वाजता

संजय नाहर 'सरहद' संस्थेचे संस्थापक... 'सरहद' काश्मीरमध्ये शांततेसाठी कार्यरत  

21 Mar 2018, 13:03 वाजता

मंगळवारी नगरच्या मारुती कुरिअर कंपनीत झाला होता स्फोट... पोलिसांच्या चौकशीत माहिती उघड 

21 Mar 2018, 13:02 वाजता

अहमदनगर : अहमदनगर कुरिअर पार्सलमध्ये स्फोट प्रकरण... ते पार्सल संजय नाहर यांच्यासाठी

21 Mar 2018, 12:40 वाजता

अहमदनगर कुरिअर पार्सल स्फोट प्रकरण... ते पार्सल संजय नाहर यांच्यासाठी - सूत्र..........संजय नाहर सरहद संस्थेचा संस्थापक .....काश्मिरमध्ये शांततेसाठी संजय नाहर कार्यरत 

21 Mar 2018, 12:32 वाजता

मुंबई : विधानसभेत 'मेस्मा' वरून गोंधळ.... शिवसेनेच्या आमदारांचा 'मेस्मा'वरून गोंधळ

20 Mar 2018, 22:00 वाजता

ठाणे : अभिनेता जँकी श्रॉफ याची बायको आयशा श्रॉफ ठाणे क्राईम ब्रांचच्या रडारवर, आयशा श्रॉफ हिने साहिल खान याची सीडिआर काढून वकील  रिझवान सिद्दीकी याला दिल्याची माहीती, आयशा श्रॉफ हिची उद्या क्राईम ब्रांच कडून चौकशी होण्याची शक्यता 

20 Mar 2018, 22:00 वाजता

ठाणे : अभिनेत्री कंगना राणावत हीने रितीक रोशनचा फोन नंबर रिझवानला एसएमएस केला होता, आता तो नंबर कशासाठी दिला होता याचीही ठाणे गुन्हे शाखा चौकशी करणार, सीडीआर रिझवान सिद्दीकी खटला

20 Mar 2018, 20:08 वाजता

वसई : गुजराती दुकान पाटयाचीं तोडफोड केल्या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्ताना अटक, वसईच्या वालिव पोलिसांनी केली अटक, उदया करणार वसई न्यायालयात हजर, अटक केलेले सर्व मनसेचे पालघरचे कार्यकर्ते, राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर वसईतील गुजराती फलक असलेल्या दुकानाचे फलक तोडले होते 

20 Mar 2018, 20:08 वाजता

सांगली : कंत्राटी अधिकाऱ्याला पदावर पुनर्रनियुक्ती करण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना तीन अधिकारी जेरबंद, लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संदीप मोहिते, विनोद चौगुले आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र भाट यांना अटक 

20 Mar 2018, 18:30 वाजता

मुंबई : मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या परीक्षा रद्द करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, आमदार भाई गिरकर यांची माहिती, दहावी पास पात्रता असलेल्या सफाई कामगारांच्या भरती परीक्षेत कठीण प्रश्न विचारण्यात आल्याने संताप