औरंगाबादमध्ये दरीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या हनुमंतखेडा इथे बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आलीय. 

Updated: Jul 16, 2017, 10:29 PM IST
औरंगाबादमध्ये दरीत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या हनुमंतखेडा इथे बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आलीय. 

शनिवारी पंधरा वर्षांची ही मुलगी पाणी आणण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडली होती. या मुलीचा मृतदेह घाटनांद्रा जवळच्या दरीत आढळून आला. गळा आवळल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

मृत मुलीवर अत्याचार झाल्याची शक्यता तिच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली. पोलीस अधीक्षक येऊन पाहणी करुन कठोर कारवाईचं आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घ्यायला तिच्या नातेवाईकांनी नकार दिला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.