२४ गाव २४ बातम्या | २४ एप्रिल २०१८

राज्यातील काही महत्वाच्या बातम्या, थोडक्यात...

Updated: Apr 24, 2018, 09:23 PM IST

महत्वाच्या हेडलाईन्स

1) संसदही कास्टिंग काऊचला अपवाद नाही... काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांचं खळबळजनक विधान... तर नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचा माफिनामा....

2) गडचिरोलीच्या जंगलात 48 तासात नक्षलींचा कणा मोडला... 37 नक्षलवाद्याना कंठस्नान... ऐतिहासिक कारवाईनंतर गडचिरोलीत सी 60 जवानांचा जल्लोष.....

3) नाणारसाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यावरून युतीत संघर्ष... अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु, देसाईंचा दावा... तर कोकणच्या हिताचा निर्णय घेणार...मुख्यमंत्र्यांची भूमिका...

4) कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्याच्या मागणीला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील... 2001-2009 दरम्यानच्या 4 लाख नव्या शेतक-यांना होणार निर्णयचा फायदा....

5) नाशिकमधल्या वसंतराव वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळल्यानं महिलेचा मृत्यू... नातेवाईकांचा डॉक्टरांवर आरोप... चौकशी करून दोषींवर कारवाईचं गिरीश महाजनांचं आश्वासन...

6) औरंगाबादमध्ये कॉपी पकडली म्हणून विद्यार्थ्याचा दुस-या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न, शिक्षकाच्या कानशिलातही लगावली, गेल्या काही दिवसांतली तिसरी घटना 

7) महाराष्ट्राच्या किना-यांवरुन मासे झाले गायब... पापलेट, सुरमई, बोंबिल, रावसची टंचाई... ग्लोबल वॉर्मिंग आणि अवकाळी पावसामुळे मासेटंचाई झाल्याची मच्छिमार संघटनेची माहिती  

8) तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आता पंढरपुरातही टोकन दर्शन सुविधा सुरु करण्याचा निर्णय.. भाविकांची रांगेत तासनतास ताटकळत उभं रहाण्याच्या त्रासातून मुक्ती.....

9) क्रिकेटचा देव झाला 45 वर्षांचा.... वाढदिवसानिमित्त सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव..... ठिकठिकाणी सचिनच्या चाहत्यांनी केलं सेलिब्रेशन... 

आणि

10) राजू हिराणी दिग्दर्शित संजू चित्रपटाचा पहिला टीझर प्रसिद्ध, रणबीर कपूर झळकणार संजूबाबाच्या भूमिकेत, 29 जूनला संजूबाबाचं वास्तव झळकणार पडद्यावर