बस-ट्रक अपघातात ३ ठार, ७ जखमी

लातूर जिल्ह्यातील अपघातांचे सत्र सुरुच आहे. लातूर-निलंगा महार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ पुन्हा एकदा एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन ठार तर सात जखमी झालेत.

Updated: Dec 2, 2017, 07:27 AM IST
बस-ट्रक अपघातात ३ ठार, ७ जखमी title=

लातूर : जिल्ह्यातील अपघातांचे सत्र सुरुच आहे. लातूर-निलंगा महार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ पुन्हा एकदा एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन ठार तर सात जखमी झालेत.

या अपघातातील जखमींना औसा आणि लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याता आले आहे. हा अपघात मध्यरात्री घडला. दरम्यान, १२ दिवसांपूर्वीच याच ठिकाणी एसटी बस-ट्रक अपघात झाला होता. यात ७ ठार तर ३१ जखमी झाले होते.