समृद्धी महामार्गावर असणार तब्बल ३१ टोलनाके

एकीकडे किती टोलनाके असणार हे सांगता येणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणत असले तरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ३१ टोल असणार आहेत.

Updated: Dec 27, 2017, 07:19 PM IST
समृद्धी महामार्गावर असणार तब्बल ३१ टोलनाके title=

मुंबई : एकीकडे किती टोलनाके असणार हे सांगता येणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणत असले तरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ३१ टोल असणार आहेत. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आलीय. ७०० किमीच्या या महामार्गावर १५०० ते २००० रुपये टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. याबाबतचं वृत्त झी २४ तासनं गेल्या आठवड्यात दाखवलं होतं. 

टोकनाके माहिती नाही

समृद्धी महामार्गाचे मॉडेल अगदी प्रायमरी स्टेजला आहे. टोल वैगरे रस्त्याचं काम सुरु झाल्यावर ठरेल. हा विषेश रस्ता आहे. १५ तासांचे अंतर ६ ते ७ तासात पार करता येणार आहे. समृद्धी महामार्गावर टोल आकारण्यात येईल. पण किती टोलनाके असतील ते आता सांगता येणार नाही.

पाहूया टोल अभ्यासक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी.