रायगडावर ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा

 तिथीप्रमाणे ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर साजरा होत आहे.

Updated: Jun 25, 2018, 02:51 PM IST

रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर साजरा होत आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती व कोकण कडा मित्र मंडळ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आमदार भरत गोगावले या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत .सकाळी ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर शिवपालखीचे राजसदरेवर आगमन झाले. तेथे राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा पडत आहे.

शिवभक्त रायगडावर दाखल 

 राजसदरेवरून पालखीचे शिवसमाधिकडे प्रस्थान होईल . शिवसमाधीला अभिवादन केल्यानंतर सोहळ्याची सांगता होईल . या कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी सजावट करण्यात आली आहे . भगवे झेंडे , ढोलताशांचा गजर यामुळे वातावरण शिवमय झाले आहे . किल्ले रायगडावर सर्वत्र धुके पसरले आहे . पाऊस असूनही शिवभक्त मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.