भिवंडीतही ४ महिलांचे केस कापल्याची घटना

Last Updated: Sunday, August 13, 2017 - 16:33
भिवंडीतही ४ महिलांचे केस कापल्याची घटना

भिवंडी : भिवंडीत अज्ञात व्यक्तींची दहशत पसरली आहे. अज्ञात व्यक्तींकडून चार महिलांचे केस कापल्याची घटना उघड झाली आहे. उत्तर प्रदेशमधील महिलांचे गेल्या काही दिवसापासून अचानकपणे वेण्या कापल्याच्या घटना ताज्या असतानाच भिवंडीतील घटना समोर आली आहे.

भिवंडीतील वेगवेगळ्या तीन  घटनांमध्ये चार महिलांच्या वेणी कापल्यानं दहशतीचं वातावरण पसरलं आहे. महिलांच्या डोक्यावरील केस कापण्याची घटना भिवंडी शहरात वा-यासारखी पसरली. यामुळे पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही केलं आहे.

First Published: Sunday, August 13, 2017 - 16:33
comments powered by Disqus