आश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा

जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा झालेय. ही विषबाधा खिचडीतून झाली आहे. 

Updated: Nov 16, 2017, 10:59 PM IST
आश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा title=

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा झालेय. ही विषबाधा खिचडीतून झाली आहे. 

या ६ विद्यार्थींनींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. माणी इथल्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प आश्रमशाळेत सहा मुलींना खिचडीतून विषबाधा झाल्यानंतर उपचारांसाठी विद्यार्थिनींना नाशिकच्या शासकीय जिल्हा रूग्णालयात हलवण्यात येणार आहे.