रत्नागिरीत मानवी वस्तीत आलेल्या ८ बिबट्यांना जीवदान

जिल्ह्यात बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यातही दक्षिण रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ८ बिबट्यांना वाचविण्या यश आलेय.

Updated: Nov 29, 2017, 10:22 PM IST
रत्नागिरीत मानवी वस्तीत आलेल्या ८ बिबट्यांना जीवदान title=

रत्नागिरी : जिल्ह्यात बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यातही दक्षिण रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ८ बिबट्यांना वाचविण्या यश आलेय.

विहिरीत, फासकीत आणि गोठ्यात 

गेल्या वर्षभरात विहिरीत फासकीत अथवा गोठ्यात सापडलेल्या ८ बिबट्यांना वाचवण्यात वनविभागाला यश आलंय. तर १०बिबटे मृत सापडलेत. यामध्ये काहींचा मृत्यू नैसर्गिक, काही वाहनाच्या धडकेनं तर काही शेणखईत पडून मृत झालेत. 

भक्षाचा पाठलाग करताना वस्तीत

जंगलात भक्ष न मिळाल्यानं बिबटे हे सध्या मानवी वस्तीकडे वळताना दिसतायत. या भक्षाचा पाठलाग करताना अनेक बिबट्यांचा विहरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्येमध्येही वाढ होताना दिसतेय. तर काहींचा नैसर्गिक मृत्यू झालाय. 

१८ बिबटे वनविभागाला सापडलेत

गेल्या वर्षभराचा विचार केला तर फक्त दक्षिण रत्नागिरीतच १८ बिबटे वनविभागाला सापडलेत. यातील सर्वाधिक बिबटे राजापूर आणि लांजा तालुक्यामध्ये सापडलेत.