सांडपाणी खड्ड्यात दोन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू

 सांडपाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे एका दोन वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला.

Updated: Jan 1, 2019, 04:47 PM IST
सांडपाणी खड्ड्यात दोन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू title=

नाशिक : सांडपाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे एका दोन वर्षांच्या लहानग्याला आपला जीव गमवावा लागल्याची ह्रदयद्रावक घटना मालेगावात घडली. अफताब खान बैतुल्ला खान असे या घटनेत मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. नव्याने विकसित झालेल्या देवीच्या मळा  भागातील शाह प्लॉट भागात महापालिकेने सांडपाण्याच्या निचरा होण्यासाठी गटार न बांधल्याने नागरिकांना सांडपाण्यासाठी घरासमोरच खड्डा करावा लागतो. याच खड्ड्याने बालकाचा बळी घेतला. 

अंगणात खेळत असतांना आफताब याच खड्यात पडला. आफताब दिसत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र आफताब कुठेच सापडला नाही. अखेर एका तासाने आफताबचा मृतदेह पाण्यावर तरंगता आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मालेगाव महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या लहानग्या जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे.