...आणि आमिर खाननं केलं अमळनेर, पारोळ्याचं कौतुक

Updated: May 16, 2018, 07:39 PM IST

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : पाणीदार महाराष्ट्रासाठी आमिर सध्या गावोगावी फिरतोय. पाहुया गाव पाणीदार करण्यासाठी आमिर कुठल्या गावात पोहोचला होता. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणीदार महाराष्ट्रासाठी सध्या आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव खान्देशच्या दौ-यावर आहेत. जळगावातल्या अमळनेर तालुक्यातल्या जवखेडात आमिरचं उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं.

जळगावातल्या अमळनेर आणि पारोळा तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केलेल्या कामाचं आमिरनं कौतुक केलं. वॉटर कप स्पर्धेत बक्षीस मिळालं नाही, तरी प्रत्येकाला पाणी मिळणारच, असं आमिर खाननं यावेळी आवर्जून सांगितलं.

गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांचा उत्साह आणि मेहनत पाहून अतिशय आनंद झाल्याची प्रतिक्रिया आमिरनं यावेळी दिली.

शहरातल्या लोकांपेक्षा गावातल्या लोकांकडून जास्त प्रेम आणि प्रेरणा मिळते, असं आमिर म्हणाला. त्याचबरोबर यंदा पाऊस कमी झाला तरी पाण्याची टंचाई भासायला नको, अशी आशाही आमिरनं व्यक्त केली. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close