नागपूर - नांदेड हिरकणी बसला अपघात, १ ठार १७ जखमी

 परिवहन मंडळाच्या नागपूर नांदेड हिरकणी बसला नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. 

Updated: Jun 23, 2017, 07:15 PM IST
नागपूर - नांदेड हिरकणी बसला अपघात, १ ठार १७ जखमी  title=

नागपूर :  परिवहन मंडळाच्या नागपूर नांदेड हिरकणी बसला नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. 
 
 चिंचोली जवळ झालेल्या या अपघातात १ प्रवासी ठार १७ प्रवासी जखमी झाले आहेत. रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळून हा अपघात झाला. अपघातात वर्धा येथील शांता धडावे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. 
 
 जखमींना तातडीनं नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.