नववीच्या विद्यार्थीनीवर एसिड हल्ला, दोघं ताब्यात

नववीत शिकणा-या विद्यार्थीनीवर तीन युवकांनी ऍसिड फेकून हल्ला केल्याची घटना

Updated: Dec 7, 2017, 11:24 AM IST
 नववीच्या विद्यार्थीनीवर एसिड हल्ला, दोघं ताब्यात

अमरावती : शहरातील गव्हरमेंट गर्ल्स हायस्कुलमध्ये नववीत शिकणा-या विद्यार्थीनीवर तीन युवकांनी ऍसिड फेकून हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेचा पोलिसांनी तात्काळ तपास करून दोघांना ताब्यात घेतलंय

आरोपींची चौकशी 

आरोपींची कसून चौकशी केली असता आपण ऍसिड नाही तर गरम तेल फेकल्याची कबुली या दोन आरोपींनी दिली.

एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचं पोलीस उपायुक्तांनी म्हंटलंय. 

गरम तेल फेकले

या आरोपींनी घटनास्थळावरून एका महिलेच्या घरी हे तेल गरम करून एका थर्मासमध्ये भरलं. त्यानंतर मुलगी जेव्हा शाळेतून घरी परतत होती तेव्हा तिच्या अंगावर हे गरम तेल फेकलं.

साहित्य जप्त 

 पोलिसांकडून दोन आरोपींसह थर्मास, कडई आणि एक दुचाकी जप्त करण्यात आलीये..