मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू

मासे पकडण्यासाठी गेले होते तलावात

Updated: Jun 24, 2018, 05:02 PM IST
मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू title=

अकोला : अकोल्यामध्ये तलावात बुडून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शीटाकळी तालुक्यात महागाव येथील ही घटना आहे. मासे पकडण्यासाठी ही 2 मुलं गेली होती. त्या दरम्यान या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. चेतन राठोड, रमेश राठोड यांचे मृतदेह सापडले आहेत. गाडगेबाबा आपत्कालीन शोध-बचाव पथकाच्या मदतीने या दोघांचा शोध घेण्यात आला.