तटकरे कुटुंबातील संघर्ष अजूनही कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यातील संघर्ष अद्याप संपलेला दिसत नाही. 

Updated: May 31, 2017, 11:29 PM IST
तटकरे कुटुंबातील संघर्ष अजूनही कायम title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यातील संघर्ष अद्याप संपलेला दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही कुटुंबांत समेट झाल्याचं दाखवण्यात आले असले तरी काका पुतण्यातील संघर्ष अद्याप सुरूच आहे.

विधानसभा निवडणूकीत श्रीवर्धनच्या जागेवरून हा वाद सुरू झाला. अवधूत तटकरे यांना श्रीवर्धनची आमदारकी मिळाली तरी संघर्ष सुरूच राहिला. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या नगरपालिका निवडणूकीत हा वाद चव्हाटयावर आला.

अवधूत तटकरे यांचे छोटे बंधू संदीप यांनी शिवसेनेत प्रवेश करून रायगडमधल्या रोह्यातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली. परंतु जिल्हा परीषद निवडणूकीपूर्वी राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी दोन्ही कुटुंबांना एकत्र आणून हा वादही संपुष्टात आणला. किमान तसं चित्र तरी निर्माण केले गेलं.