हंगामातला पहिला हापूस पुण्यात दाखल

हंगामातील पहिल्या हापूस आंब्याच्या पेटीचं पुण्याच्या मार्केट यार्डात आगमन झालंय.

Updated: Jan 21, 2018, 07:44 PM IST
हंगामातला पहिला हापूस पुण्यात दाखल  title=

पुणे : हंगामातील पहिल्या हापूस आंब्याच्या पेटीचं पुण्याच्या मार्केट यार्डात आगमन झालंय. गुलटेकडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील फळांचे व्यापारी शिवलाल भोसले यांच्याकडे हंगामातील पहील्या आंब्याची आवक झालीय.

भोसले यांच्या गाळ्यावर हापूसच्या तीन पेट्यांची आवक झाली. दाखल झालेल्या तिन्ही पेटयांना प्रत्येकी ११ हजार १११ रुपये इतका भाव मिळालाय. थंडीचं प्रमाण कमी झाल्यानतंर मार्चमध्ये हापूस आंब्याचं नियमित राज्यभरातील मार्केटमध्ये आगमन होईल. यावर्षी थंडीचा काहीसा परिणाम मोहोरांवर जरी झाला असला तरी सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आंबा हा एप्रिलपर्यंत येईल असं व्यापाऱ्यांना वाटतंय.