बिबट्याचा एकाच रात्रीत सात जणांवर हल्ला

 बिबट्याने एकाच रात्रीत सात जणांवर हल्ला केलाय.

Updated: Oct 6, 2018, 08:49 AM IST
बिबट्याचा एकाच रात्रीत सात जणांवर हल्ला title=

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे मंचर भिमाशंकर महामार्गावर बिबट्याने एकाच रात्रीत सात जणांवर हल्ला केलाय. पाच दुचाकीवर हल्ला करत बिबट्याने सात जणांना जखमी केलंय. सागर क्षिरसागर ,निलबंर झाकडे,उत्तम टेकवडे, राम  बिबवे, सुशांत फलके ,अमोल काळे,राजु काळे अशी जखमींची नावं आहेत.

घराबाहेर पडणं कठीणं 

सर्व जखमींवर घोडेगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पिंपरीच्या डी.वाय पाटील रुग्णालयात भरती केलंय. बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झालेत., रात्रीच्या वेळी त्यांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय. त्यामुळे या बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान वनविभागापुढे असणार आहे.