सरकारच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम

राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय.

Updated: Sep 13, 2017, 08:01 PM IST
सरकारच्या आश्वासनानंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय. महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर झालेल्या बैठकीनंतर संपावर ठाम राहण्याची भूमिका कृती समितीनं घेतलीय.

या बैठकीत मानधन वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव कृती समितीनं मान्य केला. मात्र निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कृती समितीनं घेतलीय. अंगणवाडी सेविकांचं मानधन १० हजार ५०० रूपये करण्याची मागणी करण्यात आलीय.  राज्यातल्या ६५ लाख विद्यार्थ्यांना २ लाख १० हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सेवा पुरवतात.