आडूळ गावाजवळ सशस्त्र दरोडा, एक ठार

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचं औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ गावाजवळ रात्रीच्या सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यामध्ये कारमधील एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. 

आडूळ गावाजवळ सशस्त्र दरोडा, एक ठार

औरंगाबाद : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचं औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ गावाजवळ रात्रीच्या सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यामध्ये कारमधील एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. 

शिवाय दीड लाखाचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. औरंगाबाद येथील इंजिनिअर असलेले सिद्धलिंग रामलिंग कोरे हे आपल्या कारने परळीहून औरंगाबादला येत होते. सुनील सुरडकर हा ड्रायव्हर कार चालवत होता. 

मध्यरात्री आडूळ गावाजवळ असताना रस्त्यालगतच्या डोंगरावरून त्यांच्या कारवर अचानक दगडफेक झाली. चालकानं गाडी थांबवली. तेव्हा डोंगराआड लपलेल्या तीन ते चार दरोडेखोरांनी कारवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही बेदम मारहाण केली. 

कोरे यांच्या जवळील रोकड, मोबाईल आणि सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी हिसकावून नेले. यात गंभीर जखमी झालेले कोरे जागीच ठार झाले तर चालक सुरडकर गंभीर जखमी आहेत.