अरविंद केजरीवाल यांचा मोदी, फडणवीस सरकारवर हल्लाबोल

राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. 

Updated: Jan 12, 2018, 07:30 PM IST
अरविंद केजरीवाल यांचा मोदी, फडणवीस सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद : राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. राज्यात कोरेगाव भीमा दंगल घडविण्यात भाजप सरकारचा हात असल्याचा आरोप केजरीवल यांनी केला. राज्यात शाळा बंद घालण्याचा घाट घातला जातोय. यांना शाळाही चालवता येत नाही तर हे सरकार काय चालवणार, अशी जहरी टीका केजरीवाल यांनी केली.

शाळा टाटा-बिर्ला यांना द्या!

तुम्हाला (भाजप) जर सरकार चालवता येत नसेल तर सरकारने टाटा-बिर्ला यांना चालवायला द्या. ज्या महात्मा ज्योतीराव फुले यांनी मुलींसाठी शाळा काढल्या त्या भाजप बंद करत आहे. या सरकारने शाळा बंद करण्याचा घाट घातलाय.  शाळा चालवता येत नसेल तर फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली.

कोरेगाव भीमा प्रकरणी निषेध

दरम्यान, कोरेगाव भीमा प्रकरणाचा केजरीवाल यांनी यावेळी निषेध केला. त्याचवेळी कोरेगाव भीमा दंगलीवर केजरीवाल यांनी भाष्य केले. भाजप दंगे घडवणारा पक्ष आहे. दंगे करा आणि राज्य करा ही भाजपची योजना असल्याचा आरोप यांनी केला.

सत्तेसाठी लोकांमध्ये भांडणं

सात हजार इंग्रजांनी ३० कोटी भारतीयांवर राज्य केले. ७० वर्षांपासून पाकिस्तान भारतीयांना धर्मा-धर्मात लढविण्याचा प्रयत्न केला. पण यश आलं नाही. मात्र भाजपवाल्यांनी ते तीन वर्षांत करून दाखवलं. भाजप हा गद्दारांचा पक्ष आहे. भाजपवाले सत्तेसाठी लोकांमध्ये भांडणं लावतात, असा थेट आरोप करत या देशाला दंग्यांची नाही तर चांगल्या शिक्षणाची गरज आहे, असे केजरीवाल म्हणालेत.

यावेळी कर्नल सुधीर सावंत यांनी 'आप'मध्ये केजरीवाल यांच्या उपस्थित प्रवेश केला.

सिंदखेडराजा येथील केजरीवाल भाषण मुद्दे -

- सिंदखेडराजा येथे आल्यामुळे मी स्वतः ला भाग्यशाली समजतो 
- पवित्र धरतीत आल्यामुळे मी नशीबवान आहे.
- ज्या महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा काढल्या त्या भाजप बंद करत आहे
- या सरकारने शाळा बंद करण्याची प्लॅनिंग केले 
- शाळा चालवता येत नसेल तर फडणवीस यांनी राजीनामा द्यावा
 - शाळा चालवू शकत नाही सरकार काय चालवणार, शाळा चालवता येत नाही मलाई खायला जमते 
- सरकार चालवता येत नसेल तर टाटा बिर्ला यांना चालवायला द्या 
 - दिल्लीत सरकारी शाळांमध्ये आम्ही क्रांती केली, शाळा बंद नाही केल्या
- 300 नवीन शाळा काढल्या.तिथे सरकारी शाळेत आम्ही स्विमिंग पूल बांधतोय, जिम काढतोय, त्यामुळे तेथील शाळांचा दर्जा खाजगी शाळांपेक्षा चांगला 
- दिल्ली सरकार सावित्रीबाई फुलेंचं स्वप्न पूर्ण करतंय 

- महाराष्ट्रात भाजपकडे पैसे नाही, मग शाळा काढायला आमच्याकडे कोठून आले?
- महाराष्ट्र भाजप सरकारने सगळा पैसा खाल्ला 
- महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत फक्त घोटाळे घोटाळे, अशी चर्चा ऐकायला मिळते
-दिल्लीत प्रामाणिक आम आदमीचं सरकार असल्याने आरोग्य योजना मोफत केल्या 
- देशात सगळ्यात स्वस्त वीज फक्त दिल्लीतच 
- दिल्लीत स्वस्त वीज मिळू शकते,महाराष्ट्रात का नाही 
- महाराष्ट्रातील जनतेला दिल्लीसारखी स्वस्त वीज पाहिजे 
- आम्ही शेतकऱ्यांना प्रतिहेकटर 50 हजारांची मदत केली, 3 महिन्यात चेक दिले 
- भाजप म्हणाले होते स्वामिनाथन आयोग लागू करू पण लागू करत नाही यासाठी आंदोलन छेडावे लागेल 
- कोरेगाव-भीमा प्रकरणा निषेध करत भाजप दंगे घडवणारा पक्ष
 दंगे करा आणि राज्य करा ही भाजपची प्लॅनिंग 
- दंगे पाहिजे असेल तर भाजपला मतदान करा, विकास हवा असेल तर सर्व पक्षांना लाथ मारून हाकला 

- 7 हजार इंग्रजांनी 30 कोटी भारतीयांवर राज्य केलं ,70 वर्षांपासून पाकिस्तान भारतीयांना धर्मा-धर्मात लढवण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही मात्र भाजपवाल्यांनी ते 3 वर्षात करून दाखवलं
- भाजप हा गद्दारांचा पक्ष,  भाजपवाले सत्तेसाठी लोकांमध्ये भांडणं लावतात 
 - या देशाला दंग्यांची नाही,चांगल्या शिक्षणाची गरज, गावा-गावात तरुणांनी गट बनवावेत
 - दिल्लीत जशी बाकीच्या पक्षांना लाथ मारली तशी लाथ मारून भाजप सरकारला राज्यातून घालवा