गरिबांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया, अटल आरोग्य शिबिराचं आयोजन

सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करुन देणार

Updated: Oct 28, 2018, 01:21 PM IST
गरिबांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया, अटल आरोग्य शिबिराचं आयोजन title=

नागपूर : गरीब आणि गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरात 'अटल आरोग्य शिबिराचं' आयोजन करण्यात आलं आहे.

नागपूरच्या दीक्षाभूमी जवळील कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मंत्री गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उदघाटन झाले.

शिबिराच्या माध्यमातून 55 हजार गरजू रुग्णांना लाभ मिळणार आहे. 10 हजार रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात राज्यभरातून 750 डॉक्टर सेवा देणार आहेत.