औरंगाबाद कचरा प्रश्न : महापालिकेचं पथक आणि पोलिसांना नागरीकांनी पिटाळले

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न चांगलाच पेटल्याचे चित्र आहे. आता अपेवाडीत पोलीस आणि महापालिकेचा पथक कचरा टाकण्यासाठी जगा पाहायला गेला असताना नागरिकांनी पोलिसांनाच पिटाळून लावले.

Updated: Mar 7, 2018, 12:52 PM IST
औरंगाबाद कचरा प्रश्न : महापालिकेचं पथक आणि पोलिसांना नागरीकांनी पिटाळले title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न चांगलाच पेटल्याचे चित्र आहे. आता अपेवाडीत पोलीस आणि महापालिकेचा पथक कचरा टाकण्यासाठी जगा पाहायला गेला असताना नागरिकांनी पोलिसांनाच पिटाळून लावले.

नागरीकांनी पोलिसांना पिटाळले

नागरिकांनी महापालिकेच्या पथकाला आणि पोलिसांना विरोध केला. नागरिक थेट पोलिसांच्या अंगावर धावून गेले. इतकेच नाही तर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. महापालिका आणि पोलीस पथकाला येथूनही पिटाळले. 

नगरसेवक कच-याबाबत गंभीर नाहीत?

तर दुसरीकडे कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेन सर्वसाधारण सभा बोलावली होती. मात्र, या सभेला ११५ पैकी केवळ १५ नगरसेवकांनी या सभेला हजेरी लावली. नगरसेवक कचऱ्याबाबत गंभीर नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बैठक बोलावूनही नगरसेवक का येत नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.