पोलिसांची गुंडगिरी समोर, दगडफेकीचा सूड घेण्यासाठी गावात घुसले आणि...

पोलिसांची गुंडगिरी समोर आलीय. काल मिटमिटाच्या गावक-यांनी केलेल्या दगडफेकीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनीही थेट गावात घुसून गावक-यांच्या घरांवर दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांचा हा कारनामा सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2018, 10:31 PM IST
पोलिसांची गुंडगिरी समोर, दगडफेकीचा सूड घेण्यासाठी गावात घुसले आणि...

औरंगाबाद : पोलिसांची गुंडगिरी समोर आलीय. काल मिटमिटाच्या गावक-यांनी केलेल्या दगडफेकीचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनीही थेट गावात घुसून गावक-यांच्या घरांवर दगडफेक केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पोलिसांचा हा कारनामा सीसीटीव्हीत कैद झालाय. 

पोलीस कारनाम्यामुळे आगीत तेल 

पोलिसांनी केलेल्या या कारनाम्यामुळे आगीत आणखीनच तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना समाजकंटकांसारखं पोलिसांनी वागणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय. विशेष म्हणजे मिटमिटाच्या गावक-यांवर पोलिसांनी अत्याचार केल्य़ाचा आरोप कालच औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. आता या सीसीटीव्हीत कैद झालेल्या प्रकारामुळे शिरसाटांच्या आरोपांना बळ मिळालंय़. यासंदर्भात विधानसभेत सोमवारी लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती शिरसाटांनी दिलीय. 

कचरा प्रश्नावर स्थनग प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर स्थनग प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.  मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आली. कच-यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारनं निर्णय घेतले असून त्यावर तातडीनं अमंबलबजावणी सुरू असल्याचा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी केला. 

शिवसेना-भाजप कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी?

औरंगाबाद प्रश्नावरून शिवसेनेतच राजकारण तापलंय. सत्तेत असताना शिवसेना-भाजप कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा टोला शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी लगावला. कचरा टाकण्यासाठी महापालिकेने जितक्या जागा शोधल्या त्या माझ्याच मतदार संघात होत्या. मात्र माझ्या मतदार संघात एक थेंबसुद्धा कचरा टाकू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी घेतलाय. त्याचबरोबर बाग़डे आणि रावसाहेब दानवे यांच्या राजकारणामुळे हा प्रश्न पेटल्याचा आरोपही त्यांनी केलाय.