औरंगाबादेत एमबीएचा पेपर व्हॉटसअॅपवर फुटला

औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात हा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2018, 01:51 PM IST
औरंगाबादेत एमबीएचा पेपर व्हॉटसअॅपवर फुटला title=

औरंगाबाद : औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात हा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

व्हॉट्स अॅपवरच उत्तरं

पेपर सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी हा पेपर व्हॉट्स अॅप ग्रुपवर पाठवला. त्यानंतर परीक्षा केंद्राबाहेरुन काही जण, यावर व्हॉट्स अॅपवरच उत्तरं देत होते. 

3 विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

एकाच वेळी दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना पेपर पाठवण्यात आल्याचं समोर आलंय. याप्रकरणी 3 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलंय.