अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती राळेगावात

वन्यजीव संरक्षण कायदा आणि  राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन झालंय का ?  याची खातरजमा आणि तपासणी 

Updated: Nov 19, 2018, 08:30 AM IST
अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती राळेगावात title=

यवतमाळ : अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त चौकशी समितीची पुनर्रचना झाल्यानंतर यासमितीचे सदस्य राळेगाव जंगलात लोणी बेस कॅम्पवर दाखल झाले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. समितीचे तांत्रिकदृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ आणि सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज, बंगलोरचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती झालीय.

तर भारतीय वन्यजीव संस्थान, डेहराडूनचे संशोधक डॉ. पराग निगम यांची सदस्य म्हणून या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. 

सूचनांचं उल्लंघन झालंय का ? 

ही समिती सहा तज्ज्ञांची असून यामध्ये मुंबईच्या वाईल्ड लाईफ कन्झरवेशनचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया आणि डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थान डॉ. बिलाल हबीब यांचा सदस्य म्हणून तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा सचिव म्हणून समावेश आहे.

ही समिती अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणात वन्यजीव संरक्षण कायदा आणि  राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन झालंय का ?  याची खातरजमा आणि तपासणी करेल.