गोमांस विक्रीच्या संशयावरून दोघांना गोरक्षकांची मारहाण

वाशीम जिल्ह्यात दोन व्यापा-यांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. जिल्ह्यातल्या मालेगावमधली ही घटना आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावातली ही घटना आहे. या गावात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मालेगाव येथील काही बजरंगदलच्या कार्यकर्त्यांना मिळाली ..

Updated: May 29, 2017, 08:40 PM IST
गोमांस विक्रीच्या संशयावरून दोघांना गोरक्षकांची मारहाण  title=

वाशिम  : वाशीम जिल्ह्यात दोन व्यापा-यांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली. जिल्ह्यातल्या मालेगावमधली ही घटना आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावातली ही घटना आहे. या गावात गोमांस विक्री होत असल्याची माहिती मालेगाव येथील काही बजरंगदलच्या कार्यकर्त्यांना मिळाली ..

 माहितीच्या आधारावर पोलिसांना न कळवता या कार्यकर्त्यांनी राजुरा गाव गाठलं. त्यावरुन या गोरक्षकांनी या दोन व्यापा-यांना हटकलं आणि त्यांना मारहाण केली. 
 
 दोन्ही विक्रेतांना मोटारसायकलवर बसवून त्यांना मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 26 मे रोजीची ही घटना आहे