संतापजनक! पीक कर्जासाठी बँक अधिकाऱ्याची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

संतापजनक प्रकार आला समोर

Updated: Jun 22, 2018, 09:24 PM IST

बुलडाणा : बँक अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या पत्नीकडे पिककर्जाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली आहे. पण सुरूवातीला सर्वात महत्वाची बाब म्हणजे, पीककर्ज हे शेतकऱ्यांसाठी हक्काचं कर्ज आहे. यासाठी बजेटमध्ये देखील तरतूद केली जाते आणि हे हक्काचं पीककर्ज देण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्याने चक्क शेतकऱ्याच्या पत्नीकडे  शरीर सुखाची मागणी केली आहे. हा संतापजनक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे हे विशेष, थकबाकी नसतानाही अनेक शेतकऱ्यांना हक्काचं पिककर्ज दिलं जात नाही. अनेक बँकांना दिलेलं पीककर्जाचं टार्गेट देखील पूर्ण होत नाही.

पीक कर्ज मंजूर करून देण्‍यासाठी बँक अधिका-याने शेतक-याच्‍या पत्‍नीकडे शरीरसुखाची मागणी केल्‍याचा संतापजनक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातल्या दताळा गावात घडली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. एकीकडे नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या वाढत असताना बँक अधिका-याच्‍या अशा घृणास्‍पद कृत्‍यामुळे संताप व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.