हार्बर रेल्वेचा भोंगळ कारभार, बेलापूर लोकल वांद्रेला नेली!

बेलापूर लोकल बेलापूरऐवजी वांद्रे येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी हार्बर मार्गावर घडला. 

Updated: May 22, 2018, 08:57 AM IST
हार्बर रेल्वेचा भोंगळ कारभार, बेलापूर लोकल वांद्रेला नेली! title=

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बेलापूर लोकल बेलापूरऐवजी वांद्रे येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी हार्बर मार्गावर घडला. रेल्वेच्या या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी छत्रपतीशिवाजी महाराज टर्मनिसवरून सुटलेली बेलापूर लोकल वडाळा स्थानकातून कुर्ल्याला जाण्याऐवजी वांद्रेच्या दिशेनं पुढे गेली. त्यामुळे प्रवाशांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला. संतप्त प्रवाशांनी बराच वेळ गोंधळ घातला. अखेर वांद्रे-वडाळा- मार्गे प्रवासी पुन्हा एकदा बेलापूरला येऊन पोहोचले. झाल्याप्रकाराबद्दल रेल्वेनं प्रवाशांकडे दिलगिरी व्यक्त केलीय.