भंडारा शहरातील कुंटणखान्यावर धाड...

भंडारा शहारातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या खात रोड परिसरातील कुंटणखान्यावर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. 

Updated: Jun 18, 2017, 10:29 PM IST
भंडारा शहरातील कुंटणखान्यावर धाड... title=

भंडारा : भंडारा शहारातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या खात रोड परिसरातील कुंटणखान्यावर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. 

या कारवाईत तीन वारंगनासह तीन जणांना अटक केलीय. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हि कारवाई केली. भाड्याच्या घरात राहणारी महिला मागील काही दिवसांपासून देहविक्रीचा व्यवसाय करत होती. 

मात्र वारंवार जागा बदलत असल्याने महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हती. मात्र अखेर पोलिसांना यश आलं आणि देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड केला.