महाविद्यालयात गीता वाटपाचे आदेश, विरोधकांची टीका

'भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंडा यामधून दिसत आहे'

Updated: Jul 12, 2018, 11:31 AM IST

नागपूर : महाविद्यालयात भगवत गीता देण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. नॅकचे A आणि A+ चे नामांकन असलेल्या मुंबईतील महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करावेत असा आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे.  उच्च शिक्षित असलेल्या तावडे यांना आणि त्यांच्या सरकार हिंदुत्ववादी धोरण राबवायचे आहे ते यावरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंडा यामधून दिसत आहे, मुंबई विद्यापीठाचा घोळ आधी निस्तरावा अशी टीका विरोधकानांनी केली आहे. भारतातील हिंदूंना विचलीत करण्याचा हा एक असफल प्रयत्न असल्याचंही विरोधकांनी म्हटलंय.