लाखोंचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला नाशिकमध्ये अटक

नाशिकमध्ये एका कुटुंबाला फसवणा-या भोंदूबाबाला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलंय.

Updated: Nov 14, 2017, 04:27 PM IST
लाखोंचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला नाशिकमध्ये अटक

नाशिक : नाशिकमध्ये एका कुटुंबाला फसवणा-या भोंदूबाबाला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलंय. घरावर करणी केल्याचं भासवून ठाण्यातील उदयराज पांडे नावाच्या या भोंदूबाबाने नाशिकच्या रक कुटुंबीयांना नऊ ते दहा लाख रुपयांचा गंडा घातला.

करणी दूर करण्यासाठी सुरु असणारी पूजा अर्धवट सोडल्याने वडिलांचा मृत्यू होईल अशी भीती या भोंदूबाबाने बारावीत शिकणा-या मुलीला घातली. ही भीती दाखवून या भोंदूबाबाने या मुलीला स्वतःच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडले. या प्रकरणी उदयराज पांडे या भोंदूबाबाला ठाण्यातून अटक करण्यात आलीय. या भोंदूबाबाविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.