अकोल्यात पावसामुळे काही भागात घरांचं मोठ नुकसान

मूर्तिजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसानं काही भागात घरांचं मोठ नुकसान झालं आहे. तालुक्यातील राजनापूर खिनखीनी या गावात वादळी पावसानं अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर काही घरांची पडझड झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसानं परिसरातील काही झाड़ं उन्मळून पडली. तर काही झाड़ं रस्त्यावर कोसळल्यानं रस्ता बंद होता. अचानक आलेल्या या वा-यामूळे राजनापूर खिनखिनीत सुमारे 20 ते 25 घरांचा नुकसान झालं. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Updated: May 29, 2017, 08:45 AM IST
अकोल्यात पावसामुळे काही भागात घरांचं मोठ नुकसान title=

अकोला : मूर्तिजापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसानं काही भागात घरांचं मोठ नुकसान झालं आहे. तालुक्यातील राजनापूर खिनखीनी या गावात वादळी पावसानं अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर काही घरांची पडझड झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसानं परिसरातील काही झाड़ं उन्मळून पडली. तर काही झाड़ं रस्त्यावर कोसळल्यानं रस्ता बंद होता. अचानक आलेल्या या वा-यामूळे राजनापूर खिनखिनीत सुमारे 20 ते 25 घरांचा नुकसान झालं. नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे पण नुकसान देखील झालं आहे.