खडसेंचा दमानियांविरोधात १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

.खडसे थोड्याच वेळात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जाऊन, दमानियांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

Updated: Apr 19, 2018, 06:59 PM IST

मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.खडसे थोड्याच वेळात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जाऊन, दमानियांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. दमानिया आपल्या कुटुंबियांची बदनामी करीत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. दमनिया यांच्याविरोधात ते १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अंजली दमानिया यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. खडसे मुक्ताईनगर पोलिसांत  तोड्याच वेळात करणार अंजली दमानियांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. दमानिया आपल्या कुटुंबियांची बदनामी करीत असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.