भाजपा नेता म्हणतो, मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार

ट्विटरवरून पंतप्रधानांवर जोरदार स्तुतीसुमनं 

Updated: Oct 12, 2018, 06:33 PM IST
भाजपा नेता म्हणतो, मोदी हे विष्णूचा ११ वा अवतार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११वा अवतार असल्याचा जावईशोध भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी लावलाय. त्यांनी ट्विटरवरून पंतप्रधानांवर जोरदार स्तुतीसुमनं उधळली आहेत. जेव्हा जेव्हा धर्म निद्रेत जाईल, तेव्हा आपण अवतार घेऊ अशं श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये म्हटलं होतं. गीतेमधला हा श्लोक लिहून त्यावर मोदींचा जन्म याच कारणातून झाल्याचा वाघ यांचा दावा आहे.

ट्विटची खिल्ली 

अवधूत वाघ यांचं हे ट्वीट सोशल मीडियात जास्त व्हायरल होतंय. या ट्वीटची चहूबाजूने खिल्लीही उडवली जात आहे. राजकिय नेत्यांकडूनही या ट्विटवर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या ट्विटची खिल्ली उडवत  अवधूत वाघ यांच्या विधानाला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close